बेळगाव : सिद्धार्थ फ्री बोर्डिंग शहापूर या संस्थेच्या सभागृहात स्वामी विवेकानंद जयंती बुधवारी साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी रोटरी क्लब वेणुग्रामचे अध्यक्ष अरविंद खडबडी होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून महेश अनगोळकर, उमेश रामगुरवाडीकर व प्राचार्य सुरेंद्र देसाई उपस्थित होते. अरविंद खडबडी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. प्राचार्य सुरेंद्र देसाई यांनी भाषण केले. उमेश रामगुरवाडीकर यांनी विद्यार्थ्यांना सात गाद्या व पाच ब्लँकेट्स देणगी दिले व त्यांनीच दिलेले वॉटर फिल्टर स्वखर्चाने दुरुस्त करून देईन, असे सांगितले. सिद्धार्थ बोर्डिंगला स्वतः व इतर पदाधिकाऱयांकडून साहाय्य केले जाईल, असे आश्वासन दिले. सिद्धार्थ बोर्डिंगच्यावतीने पवित्रा हिरेमठ यांनी समस्या मांडून सर्वांनी साहाय्य करावे, असे आवाहन केले. त्यानंतर संतोष होंगल यांनी अरविंद खडबडी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार केला.
यावेळी उदय मगेण्णवर यांनी विद्यार्थ्यांना वहय़ा, पेन, पेन्सिल व जेवण दिले. याप्रसंगी परशुराम, स्नेहल, यथार्थ, मल्लप्पा हिरेमठ, रामण्णा कांबळे व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या. माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.