प्रतिनिधी /येळ्ळूर
येळ्ळूर येथील स्वामी विवेकानंद सोसायटीमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळय़ाच्या फ्रेमचे उद्घाटन करण्यात आले. नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून सोसायटीच्या कार्यालयामध्ये अत्यंत आकर्षक अशी ही प्रेम बसविण्यात आली आहे. दुर्गामाता दौडमधील शिवभक्तांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सोसायटीचे चेअरमन प्रकाश पाटील, उपाध्यक्ष परशराम धामणेकर यांच्यासह संचालक उपस्थित होते.
स्वामी विवेकानंद सोसायटीची इमारत नुकतीच उभारण्यात आली. अत्याधुनिक अशी इमारत उभे करण्यात आली असून आता या राज्याभिषेक फ्रेममुळे आणखीनच आकर्षक आणि शिवकालीन इतिहास दर्शविणारा अंतर्भाग झाला आहे. हिंदवी स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष प्रशांत मजुकर, उपाध्यक्ष परशराम पाटील, वाय. सी. बागेवाडी यांच्या हस्ते या फ्रेमचे पूजन करण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे सोसायटीची कोणतीही रक्कम न घेता संचालकांनी स्वखर्चातून ही प्रेम आणली आहे.
सोसायटीच्या अंतर्गत सजावटीचा खर्च तसेच चहा पान असू दे किंवा इतर खर्च संचालक स्वतःच करत आहेत. एक वेगळा आदर्श सहकार क्षेत्रासमोर या संचालकांनी मांडला आहे. स्वामी विवेकानंद युवा ट्रस्टचे अध्यक्ष वाय. सी. बागेवाडी यांनी ही प्रेम दिली आहे. संचालक विवेक सुतार यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर विविध मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळय़ाचे पूजन गंगाधर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सोसायटीचे माजी अध्यक्ष अविनाश पाटील, प्रदीप पोतदार, दीपक चौगुले, वेंकटेश पाटील, महेश देसाई, किरण पाटील, पुंडलिक तळवार, कलमेश कोकणे, रुपाली कुगजी, यल्लू हुंदरे, भाऊराव पाटील, कृष्णा बिजगरकर, वसंत कुगजी, संजय हुंदरे, सेपेटरी सी. एम. पाटील, क्लार्क प्रियांका हुंदरे, रुपाली मेणसे, कपिल कंग्राळकर व शिवप्रेमी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. प्रेरणा मंत्राने कार्यक्रमाची सागंता झाली.