वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत
प्रतिनिधी /येळ्ळूर
येळ्ळूर येथील सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या स्वामी विवेकानंद मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. विवेकानंद सोसायटीच्या सभागृहात झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश विष्णू पाटील होते.
सोसायटीने यावषी तब्बल 25 कोटीहून अधिक रुपयांची वार्षिक उलाढाल केली. यामधून सोसायटीला 3 लाख 31 हजार 314 रुपये निव्वळ नफा झाला आहे. यावषी सभासदांना 8 टक्के लाभांश देण्याचे जाहीर करण्यात आले. कोरोनाकाळातही सोसायटीने सभासद, कर्जदार, संचालक, सल्लागार आणि कर्मचाऱयांच्या सहकार्यातून प्रगती साधल्याचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी सांगितले.
प्रारंभी स्वामी विवेकानंद प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर अध्यक्ष प्रकाश पाटील, उपाध्यक्ष परशराम धामणेकर, संचालिका रूपाली कुगजी, यल्लू हुंदरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वामी विवेकानंद ट्रस्टचे अध्यक्ष वाय. सी. बागेवाडी यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश पाटील यांनी अहवालाचे वाचन केले. सेपेटरी सी. एम. पाटील यांनी अहवालाचे वाचन केले. कॅशियर प्रिया हुंदरे यांनी टाळेबंद पत्रकाचे वाचन केले. प्रदीप पोतदार यांनी अंदाजपत्रकाचे वाचन केले. अविनाश पाटील यांनी नफा-तोटा पत्रकाचे वाचन केले. नफा विभागणीचे वाचन रूपाली मेणसे यांनी केले. सध्या सोसायटीकडे तब्बल 6 कोटी 55 लाख 84 हजाराच्या ठेवी असल्याचे त्यांनी सांगितले. संचालक किरण पाटील यांनीही आढावा घेतला.
यावेळी दीपक चौगुले, वेंकटेश पाटील, महेश देसाई, पुंडलिक तळवार, कलमेश कोकणे, भाऊराव पाटील, कृष्णा बिजगरकर, संजय हुंदरे, लता पाटील, सीमा बागेवाडी, साक्षी धामणेकर, सुवर्णा बिजगरकर, सुप्रिया चौगुले, मयुरी देसाई, भारता पाटील, रेखा पाटील, मयुरी तळवार आदी उपस्थित होते. विवेक सुतार यांनी सूत्रसंचालन केले. वसंत कुगजी यांनी आभार मानले.