प्रतिनिधी / कुंकळ्ळी
देवाभाट बाळळी येथील स्वातंत्र्यसैनिक गोपीनाथ मुळये नाईक (वय वर्षे 96) यांचे सोमवारी सकाळी 6 वाजता देहावसान झाले. कोविडच्या आजारामुळे नाईक यांना गेल्या शुक्रवारी मडगाव डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचाराअंती सोमवारी सकाळी 6 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. सायंकाळी 5 वाजता त्यांच्या पार्थिवावर मडगाव हिंदूसभा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्ये÷ पुत्र भारत नाईक यांनी मंत्राग्नी दिला.
गोपीनाथ मुळये नाईक हे ज्येष्ट स्वातंत्र्यसैनिक होते व राष्ट्रीय व राज्य सरकारतर्फे त्यांचा गौर झाला होता. त्यांच्या कार्याची दखल घेऊन, बाळळी रणसंग्राम प्रतिष्ठानेही मानपत्र देऊन सत्कार केला . रणसंग्राम प्रतिष्ठानचे संस्थापक सदस्य होते. नाईक यांचे कुंकळ्ळी चिफ्टन मेमोरियल समिती, कुंकळ्ळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच अन्य संस्थांकडून गौरव झाला होता. गोपीनाथ नाईक यांचा जन्म गरीब एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. पोर्तुगीज काळात मराठी 4 थीपर्यंत जनताश्रय बाळळी शाळेत शिक्षण झाले. गरीबीमुळे गोपीनाथ मुळये नाईक यांनी नंतर वीळयण भाटी सांगे येथे एस. कांतीलाल खनिज खाणीवर नोकरीवर रूजू झाले होते. व्यवसाय सांभाळताना स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्यास त्यांनी सुरुवात केली होते, याच दरम्यान कुडचडे येथील सरोजनी शाणू मडगावकर यांच्याशी ते विवाहबद्ध झाले होते. आझाद गोमंतक दलातून ते 1954 सालापासून गोवा मुक्ती चळवळीत उतरले. आझाद गोमंतक दलाचे कार्यकर्ते स्वातंत्र्यसैनिक दत्ताराम देऊ देसाई यांच्या नेतृत्त्वाखाली खडतर कार्य त्यांनी बजावले. त्यांना अटकही झाली. स्वातंत्र्यानंतरही सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग राहील. गोवा स्वातंत्र्यसैनिक संघटनेत स्वातंत्र्यसैनिक वसंत मुळये यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणी सदस्य म्हणून नेमणूक झाली होती . नाईक यांचे बाळळी रणसंग्राम प्रतिष्ठान उभारण्यात मोलाचे कार्य केले आहे. स्वातंत्र्यसैनिक स्व. गोपीनाथ मुळये नाईक यांच्या मागे पत्नी सरोजनी, पुत्र भारत नाईक (मडगाव स्टेट बँक मॅनेजर), जलसंसाधन खाते मडगाव कर्मचारी सर्वेश नाईक व रूपेश नाईक असे तीन पुत्र व मडगाव सरकारी शिक्षिका उषा नाईक, बाळळी आरोग्य कर्मचारी प्रियांका नाईक व काणकोण हॉस्पिटल नर्स आश्विनी नाईक यांचे सासरे व नातवंडे असा परिवार आहे. स्वातंत्र्यसैनिक गोपीनाथ मुळये नाईक यांच्या निधनाबद्दल मार्म गोवा एस्जी पीडीएचे चेअरमन तथा कुंकळ्ळीचे आमदार क्लॅफासीओ डायस यांनी दुःख व्यक्त केले असून देशभक्त एक सच्चा कार्यकर्त्याला आम्ही मुकल्याचे म्हटले आहे आहे, तर बाळळी रणसंग्राम प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोहीदास नाईक, सेपेटरी सुनिल फातर्पेकर यांनीही स्व. गोपीनाथ मुळये नाईक यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.