वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
डब्ल्यूटीए टूरवरील येथे झालेल्या दोन विविध महिलांच्या टेनिस स्पर्धांमध्ये युक्रेनची इलिना स्विटोलिना तसेच ऍनेटी कोंटावेट यांनी एकेरीची अजिंक्यपदे पटकाविली.
शिकागो येथे झालेल्या हार्डकोर्टवरील महिलांच्या टेनिस स्पर्धेत एकेरीच्या अंतिम सामन्यात युक्रेनच्या टॉप सीडेड स्विटोलिनाने फ्रान्सच्या कॉर्नेटचा 7-5, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. ओहीओ क्लेव्हलँड येथे झालेल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत द्वितीय मानांकित इस्टोनियाच्या कोंटावेटने रूमानियाच्या बेगुचा 7-6 (7-5), 6-4 असा पराभव करत अजिंक्यपद पटकाविले. सोमवारपासून सुरू होणाऱया अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत कोंटावेट आणि स्विटोलिना सहभागी होणार आहेत.