वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
31 ऑगस्टपासून येथे सुरू होणाऱया अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेतून पाचवी मानांकित महिला टेनिसपटू युपेनची इलिना स्विटोलिना आणि सातवी मानांकित किकी बर्टन्स यांनी कोरोनाच्या भीतीने माघार घेतल्याची माहिती स्पर्धा आयोजकांनी दिली आहे. स्विटोलिनाने गेल्यावर्षी या स्पर्धेत उपांत्यफेरीपर्यंत मजल मारली होती.
स्पेनचा पुरूष टेनिसपटू आणि या स्पर्धेतील माजी विजेता राफेल नादाल तसेच टॉप सेडेड महिला टेनिसपटू अँस्ले बार्टी यांना या स्पर्धेपूर्वी वेस्टर्न आणि सदर्न खुल्या पुरूष आणि महिलांच्या सरावाच्या टेनिस स्पर्धेत खेळण्यासाठी प्रवासाची खास परवानगी देण्यात आली आहे. कोरोना महामारी संकटामुळे अमेरिकेत आतापर्यंत 50 लाख लोकांना कोरोनाची बाधा झाली असून सुमारे 1,60,000 लांकाचे बळी पडले आहेत. 31 ऑगस्टपासून सुरू होणाऱया अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेवेळी प्रेक्षकांच्या उपस्थितीवर निर्बंध घालण्यात आल्याने आता हीस्पर्धा प्रेक्षकविना खेळविली जाईल. रोममध्ये इटालियन खुली टेनिस स्पर्धा 20 सप्टेंबरपासून खेळविली जाणार आहे. त्यानंतर एका आठवडय़ाच्या अंतराने पॅरीसमध्ये प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेला प्रारंभ होईल.