ऑनलाईन टीम / बर्न :
स्वित्झर्लंड सरकारने सार्वजनिक ठिकाणी मुस्लिम महिलांना बुरखा घालण्यावर तसेच पूर्णपणे चेहरा झाकण्यावर बंदी घातली आहे.
मुस्लिम महिलांच्या बुरखा घालण्यावर बंदी आणण्यासंदर्भात मतदानाद्वारे निर्णय घेण्यात आला.50 टक्क्यांहून अधिक लोकांनी बुरखा बंदीच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी, रेस्टॉरंट, खेळाच्या मैदानावर अथवा रस्त्यावरून चालताना पूर्ण चेहरा झाकण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी मास्क घालण्यास परवानगी आहे.