जिल्हय़ात 1 लाख 20 हेक्टरात मका पिकाची लागवड : कमी खर्चात स्वीटकॉर्नचे मिळतेय अधिक उत्पादन, मागणीतही वाढ
प्रतिनिधी / बेळगाव
अलीकडे खवय्यांनी स्वीटकॉर्नला पसंती दिली असून मागणीत वाढ झाली आहे. शहरासह ग्रामीण भागातदेखील विक्री होत आहे. पारंपरिक पिकांबरोबरच स्वीटकॉर्नच्या (मका) उत्पादनात भरघोस वाढ झाली आहे. त्यामुळे शहराच्या किरकोळ बाजारपेठेबरोबर लहान विपेत्यांकडे स्वीटकॉर्न दिसून येत आहेत. शिवाय सायंकाळच्या वेळेत चौकाचौकात असलेल्या फेरीवाल्यांकडे गर्दी वाढत आहे.
जिल्हय़ात बेळगाव तालुक्मयासह बैलहोंगल, हुक्केरी, गोकाक व रायबाग तालुक्मयात मक्मयाचे अधिक उत्पादन घेतले जाते. जिल्हय़ात 1 लाख 20 हेक्टरात मका पीक घेण्यात आले आहे. त्यापैकी 10 टक्के उत्पादन हे स्वीटकॉर्नचे असल्याची माहिती कृषी खात्याने दिली आहे. त्यामुळे स्वीटकॉर्नचे उत्पादन वाढताना दिसत आहे. दरवषी पावसाळय़ाला सुरुवात झाली की मक्मयाच्या कणसांची आवक सुरू व्हायची. मात्र अलीकडे खायला स्वादिष्ट असलेल्या स्वीटकॉर्नला खवय्यांकडून पसंती दिली जात आहे. त्यामुळे शहरातील हातगाडे, चित्रपटगृहे, हॉटेल, बैठे विपेते आदी ठिकाणी स्वीटकॉर्नची विक्री वाढली आहे.
शहरातील एपीएमसी मार्केटबरोबरच किरकोळ बाजारातदेखील स्वीटकॉर्न उपलब्ध होत आहेत. किरकोळ विपेत्यांकडून 5 ते 10 रुपयाला एक कणीसप्रमाणे विक्री होते. शिवाय पर्यटनस्थळ, जत्रा, मंदिर आवारातदेखील विक्री वाढली आहे. गोवा राज्यातदेखील मोठय़ा प्रमाणात स्वीटकॉर्न निर्यात वाढली आहे. वर्षभर स्वीटकॉर्न उपलब्ध होत असली तरी पावसाळा हा स्वीटकॉर्नचा मुख्य हंगाम आहे. त्यामुळे सध्या शहरात सगळीकडे स्वीटकॉर्न दिसून येत आहेत. दरम्यान पांढऱया स्वीटकॉर्नच्या तुलनेत पिवळे स्वीटकॉर्न चविष्ट असल्याने त्याला मागणी आहे. बाजारात स्वीटकॉर्नची कणसे 5 ते 10 रुपयापर्यंत विक्री होत आहेत.
मका पिकाबरोबर स्वीटकॉर्नच्या कणसाची चव स्वादिष्ट असल्याने त्याला बाजारात अधिक मागणी आहे. खरीप व रब्बी दोन्ही हंगामामध्ये उत्पादन घेतले जाते. बाजारात चांगला भाव मिळत असल्याने ग्रामीण भागात बटाटा, भाजीपाला तसेच हरभरा, वाटाणे, मसूर आणि कडधान्य पिकांबरोबर स्वीटकॉर्न उत्पादनाकडे ओढा वाढला आहे. शेतकऱयांना आर्थिकदृष्टय़ा स्वीटकॉर्न फायदेशीर ठरत आहे.
कमी खर्चात अधिक उत्पादन
कमी खर्चात स्वीटकॉर्नचे अधिक उत्पादन घेतले जाते. शिवाय ऊस, बटाटा, भुईमूग आदी पिकांमध्ये अंतरपीक म्हणून मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्यामुळे शेतकऱयांचा स्वीटकॉर्न पिकाकडे कल वाढला आहे. दरम्यान कणसे तोडून पीक जनावरांना चारा म्हणून उपयुक्त ठरते. खरीप आणि रब्बी हंगामामध्ये उत्पादन घेतले जात आहे. त्यामुळे अलीकडे स्वीटकॉर्नला कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे पीक म्हणून पाहिले जात आहे.
बियाणांचा दर अधिक
जमिनीत पेरणी करणाऱया स्वीटकॉर्न मका बियाणांचा दर अधिक असतो. साधारण तीन ते साडेतीन हजार रुपये प्रतिकिलो दर असतो. साधारण 90 दिवसांचे पीक असणाऱया स्वीटकॉर्नच्या बियाणांची किंमत मात्र इतर बियाणांपेक्षा अधिक आहे.
विविध भागात उत्पादन
बेळगाव तालुक्मयातील कडोली, गुंजेनहट्टी, जाफरवाडी, मण्णीकेरी, देवगेरी, चलवेनहट्टी, बोडकेनहट्टी, कंग्राळी (बी. के), उचगाव, तुरमुरी, कल्लेहोळ, हंदिगनूर, अतिवाड, बेकिनकेरे, कुद्रेमनी, होनगा, काकती, गौंडवाड, बेळगुंदी, सोनोली, बेळवट्टी यासह तालुक्मयाच्या पूर्व भागात स्वीटकॉर्नचे उत्पादन घेतले जाते.