ऑनलाईन टीम / स्टॉकहोल्म :
स्वीडनमध्ये एक छोटे विमान क्रॅश झाले. या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. स्टॉकहोमपासून 160 किमी अंतरावर ओरेब्रो विमानतळाजवळ हा अपघात झाला. या विमानात 8 स्कायडायव्हर्स आणि 1 वैमानिक होते. ओरेब्रो विमानतळाच्या धावपट्टीजवळ विमानाने उड्डाण भरल्यानंतर लगेच विमानाला आग लागली, त्यानंतर हे विमान क्रॅश झाले.