कतार : स्वीसचा 39 वर्षीय अनुभवी आणि ज्येष्ठ पुरूष टेनिसपटू रॉजर फेडररने तब्बल 13 महिन्यांच्या कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्रात आपले पुनरागमन विजयाने केले आहे. येथे सुरू असलेल्या कतार इक्सॉन मोबिल खुल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात फेडररने ब्रिटनच्या इव्हान्सचा पराभव करत विजयी सलामी दिली. या स्पर्धेतील झालेल्या पुरूष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात फेडररने इव्हान्सचा 7-6 ( 10-8), 3-6, 7-5 असा पराभव केला. तब्बल 405 दिवसांनंतर फेडररचा हा पहिला सामना होता. या सामन्यात फेडररला विजयासाठी जवळपास अडीच तास झगडावे लागले. आता फेडररचा दुसऱया फेरीतील सामना बॅसिलसेव्हेलीशी होणार आहे.
Previous Articleमिथून चक्रवर्ती यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा
Next Article भारत-दक्षिण आफ्रिका महिलांचा तिसरा वनडे सामना आज
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.