वृत्तसंस्था/ रोम (इटली)
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या इटालियन खुल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्वीसच्या स्टॅनीसलास वावरिंकाने विजयी सलामी देताना अमेरिकेच्या ओपेल्काचा पराभव केला.
दुखापतीमुळे तब्बल 14 महिने टेनिस क्षेत्रापासून अलिप्त राहिलेल्या वावारिंकाची एटीपी टूरवरील ही दुसरी स्पर्धा आहे. सोमवारी झालेल्या पहिल्या फेरीतील सामन्यात वावरिंकाने ओपेल्काचा 3-6, 7-5, 6-2 असा पराभव करत विजयी सलामी दिली. वावरिंकाने यापूर्वी तीन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा जिंकल्या असून त्याचा पुढील फेरीतील सामना डिजेरी आणि कोरीक यांच्यातील विजयी खेळाडूबरोबर होणार आहे. गेल्या एप्रिलमध्ये झालेल्या माँटेकार्लो स्पर्धेत वावरिंकाने दुखापतीनंतर पुनरागमन केले होते.