प्रतिनिधी/ पणजी
गोव्याचे पहिले मुख्य़मंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांची जयंती राज्यात पाळण्यात आली. यानिमित्त त्यांच्या पुतळ्य़ास पुष्पहार घालून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. मिरामार – पणजी येथील बांदोडकर समाधीवर अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पुष्पचक्रे वाहिली आणि त्यांना वंदन केले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, मगोपचे नेते सुदिन ढवळीकर, आपचे वाल्मीकी नाईक, राहुल म्हांबरे व इतर विविध राजकीय पक्ष कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी समाधीला भेट देऊन पुष्पांजली वाहिली.