ती पुनरावृत्ती झाल्यास आगामी निवडणुकीत 21 जागा मिळणार : स्व. पर्रीकरांमुळेच आम्ही एकसंघ राहिलो
प्रतिनिधी /म्हापसा
आगामी 2022 च्या निवडणुकीत आम्ही 21 आकडा पार करून निवडणूक सहज जिंकणार. मंत्री मंडळात तीन आमदार असणार असे आपण म्हटले आहे. पक्ष कुठला तो नंतर पाहू. आपण भाजपचा सदस्य व मंत्री आहे. पक्षविरोधात वा नवीन पक्षाबाबत काहीही बोलू शकत नाही. स्व. मनोहर पर्रीकरांची राज्यासाठी दूरदृष्टीकोन होता त्याची तत्वनिष्ठा पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती मंत्री मायकल लोबो यांनी दै. ‘तरुण भारत’शी बोलताना दिली. कांदोळी येथे एक कार्यक्रम आटोपल्यानंतर मंत्री लोबो बोलत होते.
पर्रीकरांमुळेच आपण भाजपात
स्व. मनोहर पर्रीकर हे थोर नेते होते. त्यांच्याकडे गोव्याच्या विकासासाठी दूरदृष्टीकोन होता. त्यामुळेच रोहन खंवटे यांनी त्यांना साथ देत आपला पाठिंबा दिला. 2005 साली आपण स्व. पर्रीकरामुळे भाजपमध्ये आलो. त्यावेळी दयानंद सुरक्षा योजना सुरू केली. आम्ही भाजपमध्ये येणार नव्हतो कारण आम्ही काँग्रेस कार्यकर्ते होतो पर्रीकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही भाजपात आलो कारण पर्रीकर राज्यात काहीतरी करणार हे माहीत होते व आम्हाला तशी संधीही मिळाली व आपण आमदार झालो. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही खूप काही शिकलो. त्याचा वारसा पुढे नेणे काळाची गरज आहे, असे मंत्री मायकल लोबो म्हणाले.
आपल्याबाबतचा निर्णय मतदार घेणार
आम्हा आजही लोकांबरोबर आहोत् स्व. पर्रीकरांना शब्द दिला होता की आम्ही भाजपमध्येच राहणार. तो शब्द आम्ही अजूनपर्यंत पाळला आहे. 2017 मध्ये सर्वत्र गोंधळ माजला होता आम्ही पक्ष सोडतो म्हणून सर्वत्र चर्चा चालू होती. मात्र आम्ही पक्ष सोडला नाही. स्व. पर्रीकरांचे विचार आम्ही लोकांना द्यायला पाहिजेत. यासाठी काय तो निर्णय जनता घेणार आहे, असे मंत्री मायकल लोबो म्हणाले.
मतदारांनी सांगितल्यास डिलायला मागे सरणार
विनोद पालयेकर यांनी पाबलो एस्कोबार म्हटले असले तरी त्यांनी आपले नाव घेतले आहे काय? असा उलट प्रश्न पत्रकारांना करीत मंत्री लोबो म्हणाले की, ते एक आमच्या मंत्री मंडळातील मित्र होते. त्यांच्याबाबत आपण काहीच बोलणार नाही. एकेकाळी ते म्हणत होते आपल्यास निवडून आणण्यास मायकल लोबोनी खूप मदत केली. मला त्यांच्या विरोधात काहीच बोलायचे नाही. त्यांनी लोकांसाठी चांगले कार्य केल्यास लोक त्यांना पुन्हा निवडून आणतील. आपली पत्नी डिलायला पाठीमागे येईल. पालयेकरांनी चांगले कार्य केले आहे म्हणून आम्ही त्यांनाच मते देणार असे लोकांनी सांगू द्या, असे मंत्री लोबो म्हणाले.