प्रतिनिधी /पणजी
व्हायकाउंट हायस्कूलचे ट्रस्टी आणि पेडण्याचे माजी आमदार रावराजे जितेंद्र देशप्रभू यांची जयंती यावषी व्हायकाउंट हायस्कूलमध्ये 31 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. याच अनुषंगाने नुकतीच तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धचे शाळेत आयोजन केले होते. या सदर स्पर्धेत उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. पेडणे तालुक्मयातील एकूण 16 शाळांनी यात सहभाग दर्शवला. सदर स्पर्धा पेडणे बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने आयोजित केली होती. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे, प्रथम – व्हायकाउंट हायस्कूल पेडणे, द्वितीय- विद्याप्रसारक हायस्कूल मोरजी, तृतीय – माउंट कार्मेल हायस्कूल हरमल, तर उत्तेजनार्थ प्रथम हुतात्मा बापू मेमोरियल हायस्कूल चांदेल आणि उत्तेजनार्थ द्वितीय पार्से हायस्कूल, पार्से यांना प्राप्त झाले. सदर स्पर्धेची बक्षिसे 31 मार्च रोजी ठिक 11 वाजता शाळेत आयोजित केलेल्या जयंती कार्यक्रमात वितरित केली जातील. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजिका डॉ. प्रमोद साळगावकर, सन्माननीय अतिथी म्हणून शाळेच्या ट्रस्टी श्रीमती रूपा देशप्रभू, खास निमंत्रित म्हणून पेडणे बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष श्री प्रभाकर शेटये आणि माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष दुर्गादास परब, मुख्याध्यापक राजेंद्र बोंदे आणि प्राथमिक विभागाचे प्रमुख राजमोहन शेटये उपस्थित असतील. दि. 31 मार्च रोजी सकाळी 9 वाजता रक्तदान शिबिरांने या कार्यक्रमाची सुरुवात होईल. आझिलो हॉस्पिटल म्हापसा येथील रक्तपेढीचे तज्ञ डॉक्टर रक्तदान शिबिरास सहकार्य करतील. स्वर्गीय देशप्रभूच्या सर्व हितचिंतक, चाहते यानी या कार्यक्रमास उपस्थित लावून तसेच रक्तदान शिबिरात सहभागी होऊन हा जयंती कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहान शाळेच्या वतीने केले आहे.