सीईओ एच. व्ही. दर्शन : महिलादिनानिमित्त वस्तू प्रदर्शन
प्रतिनिधी /बेळगाव
स्वसाहाय्य संघांकडून तयार होणारे साहित्य विविध प्रांतात विकले जात आहे. परदेशातही या साहित्याला मागणी वाढत आहे. शासनाने साहित्य निर्मितीसह त्या साहित्याला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. ग्रामीण भागात तयार होणाऱया वस्तूंना मागणी आणि त्याबाबतचे विविध प्रांतातील लोकांचे आकर्षण पाहता या माध्यमातून स्त्रियांचे आर्थिक सशक्तीकरण सहज शक्मय असल्याचे मत जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. व्ही. दर्शन यांनी मांडले.
महिलादिनाचे औचित्य साधून येथील कन्नड साहित्य भवनात वस्तू प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. स्वसाहाय्य संघांच्या माध्यमातून ग्रामीण भागात महिला संघटन करणाऱया प्रतिनिधींचा यावेळी सन्मान करण्यात आला. व्यासपीठावर योजना संचालक रवी बंगारप्पन्नावर, महिला व बालकल्याण खात्याचे उपसंचालक बसवराज वरवट्टी, जिल्हा कौशल्याभिवृद्धी अधिकारी बसवप्रभू हिरेमठ, साहाय्यक संचालक राजेंद्र कुलकर्णी उपस्थित होते.
प्रदर्शनात जिल्हय़ातील विविध स्वसाहाय्य संघांनी बनविलेल्या वस्तू मांडण्यात आल्या होत्या. स्वागत प्रवीण देशपांडे, सूत्रसंचालन रघुचंद्र कांबळे तर आभार मिथुन कांबळे यांनी मानले.