वार्ताहर / किणये
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित हंगरगा येथील काळम्मा देवी हायस्कूलसाठी नवीन कूपनलिकेच्या खोदाईचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.
हंगरगा येथील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना पाण्याची सोय व्हावी यासाठी या कूपनलिकेची खोदाई करण्यात येणार आहे. श्रीफळ वाढवून मोनाप्पा चलवेटकर यांनी पूजन केले. यावेळी कृष्णा हुंदरे, कृष्णा पाटील, बळीराम पार्लेकर, मोनाप्पा मुतकेकर, बी. बी. पार्लेकर, नारायण पाटील, दिलीप कांबळे, परशराम पाटील, मल्लाप्पा हुंदरे, यल्लाप्पा पाटील आदींसह नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व सदस्या उपस्थित होत्या.
मुख्याध्यापक के. पी. शिवणगेकर यांनी आभार मानले.