वार्ताहर / किणये
माजी आमदार बी. आय. पाटील व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांना हंगरगे ग्रामस्थांच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. लक्ष्मी मंदिर येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका पंचायत माजी सदस्य कृष्णा हुंदरे होते.
प्रारंभी कृष्णा पाटील यांच्या हस्ते बी. आय. पाटील व सुरेश अंगडी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. बी. आय. पाटील हे चार वेळा आमदार झाले होते. या कालावधीत त्यांनी सीमाभागातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक विकासकामे केली. ते सर्वांशी अगदी मनमोकळेपणाने व आपुलकीने बोलायचे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे बेळगावसह ग्रामीण भागातील जनतेला फार मोठा धक्काच बसला आहे, असे मनोगत कृष्णा हुंदरे यांनी व्यक्त केले. जिल्हा पंचायत माजी सदस्य दिलीप कांबळे, विशाल सावंत, लक्ष्मी मुतगेकर, मनोहर शहापूरकर, परशराम पाटील, जयवंत पाटील आदींची यावेळी श्रद्धांजलीपर भाषणे झाली. यावेळी गावडू पाटील, बळीराम पार्लेकर, यल्लाप्पा पाटील, सहदेव सावंत, मोनाप्पा मुतगेकर, लक्ष्मण सावंत, यल्लाप्पा पाटील, मल्लाप्पा हुंदरे, कल्लाप्पा पार्लेकर, मल्लाप्पा पाटील, मलिक कांबळे, प्रकाश चलवेटकर, नेमाणी हुंदरे, मारुती आजरेकर, शिवाजी चलवेटकर आदी उपस्थित होते.