बुडापेस्ट
: हंगेरीच्या नऊ जलतरणपटूंना कोव्हिड-19ची बाधा झाली असल्याची माहिती हंगेरीच्या जलतरण संघटनेने दिली आहे. कोरोनाची बाधा झालेल्या हंगेरीच्या या जलतरणपटूंमध्ये बटरफ्लाय प्रकारातील विश्वविजेत्या कापासचा समावेश आहे. हंगेरीचा जलतरणपटू डॉम्निक कोझमा यालाही कोरोनाची लागण झाली आहे. त्याने 2017 च्या विश्व जलतरण स्पर्धेत कास्यपदक मिळविले होते. हंगेरीची 26 वर्षीय जलतरणपटू कापास हिने 2019 साली झालेल्या विश्व जलतरण स्पर्धेत बटरफ्लायमध्ये सुवर्णपदक मिळविले होते. कोरोना व्हायरसमुळे हंगेरीत आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे.
असून सुमारे 525 जणांना याची बाधा झाली आहे.