शिकागो
अमेरिकेच्या दक्षिणेकडील प्रांतांना हिमवादळ आणि मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. शिकागोमध्ये हिमवादळ आणि खराब हवामानामुळे शुक्रवारी सर्व विमानतळांवरील 1000 विमानोड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. वादळाचा 9 कोटी लोकांना फटका बसला आहे. शिकागोमध्ये शुक्रवारी दुपारी वादळ धडकले आहे. सॉल्ट लेक सिटीच्या अनेक भागांमध्ये 5 इंचापर्यंत बर्फ जमा झाल्याने शाळा, विद्यालये आणि शासकीय कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. कंसास सिटी विमानतळावर विमान घसरले असून दुर्घटनेत कुणीही जखमी झालेले नाही.
प्रवाशांना अन्य विमानाद्वारे इच्छितस्थळी पोहोचविण्यात आले आहे. आगामी काळात हिमवादळ अधिक उग्र होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.