ऑनलाईन टीम / रियाध :
कोरोना संकटातही सौदी अरेबियाने हज यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेसाठी केवळ सौदी अरेबियातीलच मर्यादित लोकांनाच परवानगी देण्यात येणार आहे. सौदी अरेबियाच्या हज आणि उमरा विषयक मंत्रालयाने यासंदर्भात एक पत्रक जारी केले आहे.
इस्लामच्या पाच मूलभूत स्तंभांपैकी शेवटचा स्तंभ हज मानला जातो. मुस्लीम नागरिकांची आयुष्यात एकदा तरी हजची यात्रा करण्याची इच्छा असते. इस्लामिक कॅलेंडरनुसार यंदा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात हज यात्रा आली आहे. कोरोना संकतातही सौदी अरेबियाने या यात्रेला परवानगी दिली आहे. सौदी अरेबियाच्या बाहेरील कोणालाही या यात्रेसाठी परवानगी दिली जाणार नाही.
या यात्रेसाठी जे लोक येतील, त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असून, सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात येणार आहे.