प्रतिनिधी /म्हापसा
हडफडे येथील आरवेश्वर मंदिरात रविवार दि. 13 रोजी साप्ताहिक रविवार उत्सव हडफडे येथील हॉटेल दीवानभाटी टॅक्सी बॉईज आयोजक व यजमान विष्णू (जीतू) गुरुदास गोवेकरतर्फे साजरा होणार आहे.
यानिमित्त मंदिरात आरवेश्वर पूजा, अर्चा, अभिषेक व इतर धार्मिक विधी, सायं. 7.30 वा. भजनी कलाकार आतिष कारापूरकर, शुभम नाईक, सूरज शेटगावकर यांचा भजनाचा कार्यक्रम होईल. त्यांना संवादिनीवर सुनाद कोरगांवकर तर तबल्यावर बुद्धेश तळकर साथसंगत करतील. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थान मानकरी तुकाराम दिवकर यांनी केले आहे.