प्रतिनिधी / बेळगाव
हणमापूर क्रॉस, ता. अथणीजवळ 28 किलो 881 ग्रॅम चंदन जप्त करण्यात आले आहे. शनिवारी पोलीस वनविभागाच्या उपनिरीक्षिका रोहिणी पाटील व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली असून या प्रकरणी ऐनापूर, ता. अथणी येथील एका युवकाला अटक करण्यात आली आहे. त्याच गावातील आणखी एक जण फरारी झाला आहे.
राजू विठ्ठल शिंगे (वय 42) राहणार ऐनापूर, ता. कागवाड असे पोलिसांनी अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याचा आणखी एक साथीदार जानाप्पा ऊर्फ पिंटू रामाप्पा मेखळी, रा. ऐनापूर हा फरारी झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अथणी पोलीस स्थानकात या दोघा जणांविरुद्ध भादंवि 379 व 86, 87, कर्नाटक वनकायदा 1963 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
राजू व जानाप्पा हे मोटारसायकलवरून चंदन विक्रीसाठी मुरगुंडीहून मदभावीकडे जात असल्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षिका रोहिणी पाटील, हवालदार एस. आर. अरीबेंची, के. डी. हिरेमठ, जीपचालक बी. बी. इंगळगी आदींनी हणमापूर क्रॉसजवळ या दोघांची मोटारसायकल अडवून त्यांची तपासणी केली. त्यावेळी त्यांच्याजवळ चंदनाचा साठा आढळून आला.
पोलिसांना पाहताच जानाप्पाने तेथून पळ काढला आहे. पोलिसांनी 89 हजार 643 रुपये किमतीचे 29 किलो 881 ग्रॅम चंदन जप्त केले असून फरारी झालेल्या जानाप्पाचा शोध घेण्यात येत आहे. अथणी, कागवाड तालुक्मयात यापूर्वीही पोलीस वनविभागाने चंदन व वन्यप्राण्यांची तस्करी करणाऱया चोरटय़ांचा शोध घेतला आहे.