प्रतिनिधी / अक्कलकोट
अक्कलकोट तालुक्यातील हत्तीकणबसच्या मठातील मठाधिपती प्रभूशांत महास्वामीजीच्या मठातील बंद विश्रांती खोलीचे कुलूप तोडून २ लाख ९५ हजाराचा मद्देमालाची अज्ञात चोरट्यानी चोरी केली आहे ही घटना दि २२ ते २७ तारखेच्या दरम्यान मठात घडली आहे. याबाबत अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, हत्ती कणबस येथील मठातील प्रभूशांत महास्वामीजीच्या विश्रांती खोलीचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने ३५ ग्राम वजनाचे सोन्याचे ब्रासलेट, ५००,२००,१००, ५०,२० व १० रुपयेच्या चलनी नोटा मिळून २ लाख ९५ हजाराचा मुद्देमाल चोरट्याने मठाचे बंद खोलीचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करून कपाटात ठेवलेले सोने व रोख रक्कम शिताफीने चोरीस नेला आहे.ही घटना दि २२ एप्रिल ते २७ एप्रिल कालावधीत मठात घडली आहे.याबाबत दि २८ रोजी मठाचे मठाधिपती प्रभूशांत महास्वामीजी यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध फिर्याद दिली आहे. पुढील तपास अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश भावीकट्टी हे करीत आहेत.