ऑनलाईन टीम / लंडन :
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार हनीफ टायगरला भारताकडे सोपवण्यास ब्रिटनने नकार दिला आहे. ब्रिटनमधील पाकिस्तानी वंशाचे नेते साजिद जावेद यांनी भारताच्या याबाबतच्या प्रस्तावाला विरोध केला आहे.
जावेद हनीफ याच्यावर बॉम्बस्फोट, दहशतवादी कारवाया यासह अनेक गुन्हे दाखल आहेत. सूरतमध्ये 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मिर्चीशी त्याचा संबंध असल्याची चर्चा आहे. तो हनीफ मोम्मद उमेरजी पटेल या नावाने ओळखला जातो. 2010 मध्ये भारतीय गुप्तचर यंत्रणानी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्याला ब्रिटनमध्ये अटक केली होती.
हनिफला ब्रिटनने भारताकडे सुपूर्द करावे यासाठी भारतीय अधिकाऱ्यांनी त्याचे प्रत्यार्पण वॉरंटही मिळवले. मात्र, हनीफने त्याविरोधात कोर्टात धाव घेतली. हनीफची याचिका कोर्टाने 2013 मध्ये फेटाळली. त्यानंतर हे प्रकरण ब्रिटनच्या गृहसचिवांकडे गेले. अनेक वर्ष सुनावणी झाल्यानंतर 2019 मध्ये हनीफच्या प्रत्यार्पणाला ब्रिटनने नकार दिला. भारत सरकार पुन्हा एकदा ब्रिटन सरकारकडे हनीफ टायगरच्या प्रत्यार्पणाची मागणी करू शकतो. मात्र, या दरम्यान, हनीफ स्थानिक कोर्टात जामीन अर्ज दाखल करू शकतो.