ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
बॉलिवूड पॉप सिंगर यो यो हनी सिंह याच्या विरोधात त्याची पत्नी शालिनी तलवारने घरगुती हिंसाचाराची तक्रार दिल्लीतील तीस हजारी कोर्टात दाखल केली होती. हनी सिंगच्या पत्नीने 10 कोटी रुपयांच्या भरपाईची मागणी केली आहे. या प्रकरणाची आज सुनावणी होती. मात्र, या सुनावणीला यो यो हनी सिंह अनुपस्थित राहण्याची परवानगी मागितली होती.
हनी सिंहच्या वकिलांनी हनी सिंहची प्रकृती नीट नसल्याने तो सुनावणीला हजर राहू शकत नाही, असे सांगितले. पुढच्या सुनावणीला तो हजर राहील, असे आश्वासन देखील हनी सिंहच्या वकिलांनी दिले. मात्र, मात्र, कोर्टाने त्याला चांगलेच फटकारले असून कोर्टाने हनी सिंहला मेडिकल रिपोर्ट आणि आयटी रिटर्न सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हनी सिंहच्या अडचणीत वाढ होण्याची शक्मयता आहे.
दरम्यान, सुनावणीच्या वेळी हनी सिंहच्या वकिलांनी या प्रकरणी उत्तर दाखल करण्यासाठी काही वेळ मागितला आहे. सुनावणीसाठी हनी सिंहच्या वकिलांनी केलेल्या विनंतीवर बोलताना ‘कोणीही कायद्यापेक्षा वर नाही’ असे देखील कोर्टाने म्हटले यावर हनी सिंहच्या वकिलांनी न्यायालयाला विश्वास दाखवत हनी सिंह लवकरात लवकर न्यायालयात वैद्यकीय अहवाल आणि आयकर विवरणपत्र सादर करेल, असे सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी पुढच्या महिन्यात 3 सप्टेंबरला होणार आहे.