बेळगाव : हनुमाननगर, टीव्ही सेंटर सर्कलनजीक पवार यांच्या घराशेजारी वर्षभरापासून कचऱयाचा ढीग पडून आहे. भर वस्तीतील कचऱयाचा ढीग हलविण्यासाठी परिसरातील रहिवाशांनी वारंवार मुकादम, कॉन्ट्रक्टर पावशे व माजी नगरसेवक देशपांडे यांच्या निदर्शनास आणले. यावेळी फक्त आश्वासने देण्यात आली. परंतु अद्याप सदर कचऱयाची उचल न झाल्याने अवकाळी पावसामुळे सदर कचरा कुजून दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे परिसरातील डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. संबंधित अधिकाऱयांनी पाहणी करून हनुमाननगर टीव्ही सेंटर परिसरातील कचऱयाचे ढीग हलवावेत, अशी मागणी होत आहे.
Previous Articleशब्दगंधच्या बैठकीत काव्यवाचन
Next Article भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयाला बी.पी.रवी यांची भेट
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.