प्रतिनिधी/ बेळगाव
हनुमाननगर, सदाशिवनगर या परिसरात काम करणाऱया महापालिकेच्या सफाई कामगारांना तसेच पोलीस कर्मचाऱयांना आर्सेनिक अल्बम 30 या बुस्टर डोसचे वितरण करण्यात आले. माजी नगरसेविका आणि मार्कंडेय साखर कारखान्याच्या संचालिका निलिमा पावशे यांनी औषधाचे वितरण केले.
केंद्र सरकारच्या आयुष विभागातर्फे या औषधाबद्दल डॉ. बसवराज आदी व डॉ. गीता आदी यांनी माहिती दिली. महापालिकेचे कर्मचारी स्वतःचा जीव धोक्मयात घालून शहराची स्वच्छता करतात. याचबरोबर पोलीसही 24 तास सेवा बजावत आहेत. जनतेसाठी हे सर्वजण काम करत आहेत. त्यामुळे जनतेनेही त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे. कोरोनाबाबत दक्षता घेणे महत्त्वाचे आहे, असे मत निलिमा पावशे यांनी व्यक्त केले.
यावेळी एपीएमसी पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक लक्ष्मण कट्टी, हवालदार गंडप्पगोळ, हिंडलगा ग्रा. पं. सदस्य मिथुन उसुलकर, मनोज पावशे, विशाल चौगुले, शांता किसान, योगेश बेळगावकर, प्रवीण मर्डी यांच्यासह स्वच्छता आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.