प्रतिनिधी / कणकवली:
हप्त्याने वीजबिल भरण्यास सवलत असतानाही कलमठ गावातील थकबाकीदार घरगुती कनेक्शन तोडण्याचे आदेश महावितरणच्या शाखा अभियंत्यांनी दिले. त्यानुसार एकाचे कनेक्शन कट करतानाच भाजप पदाधिकारी संदीप मेस्त्राr यांनी संबंधित अधिकाऱयांना जाब विचारला. त्यानंतर तोडलेल्या वीज कनेक्शनची तात्काळ जोडणी करण्यात आली. कलमठ गावात थकीत वीजबिलामुळे वीज कनेक्शन तोडण्यासाठी महिला कर्मचाऱयांसह वीज वितरणचे कर्मचारी गुरुवारी पाठविण्यात आले होते. एका ग्राहकाच्या 14 हजारच्या बिलापोटी 4 हजार रुपये भरत असतानाही घरगुती वीज कनेक्शन तोडण्यात आले. वीज तोडणीबाबतची नोटीस न देताच, चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्याचे आदेश देणाऱया ग्रामीणच्या शाखा अभियंत्यांना जाब विचारला. त्यानंतर वीज कनेक्शनची पुन्हा जोडणी करण्यात आली.