ऑनलाईन टीम / तरुण भारत
आम आदमी पार्टीच्या 7 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ समाप्त होणार असुन आपले राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवार कोण असतील ? याबाबत स्पष्टीकरण ही दिलं आहे.आम आदमी पार्टीनं राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आपल्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केलीये.
यामध्ये वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचा सदस्य राहिलेल्या हरभजन सिंगचाही समावेश आहे. पंजाबमधील 7 पैकी 5 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 9 एप्रिल 2022 रोजी संपुष्टात येत आहे. राज्यसभेच्या या पाच जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची सोमवारी शेवटची तारीख होती. आपकडून हरभजन सिंगनही अर्ज भरला आहे. त्यानंतर हरभजनची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
आपल्याला प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिऴल्यास क्रीडा क्षेत्राचा विकास करणे हेच माझ्यासमोरील ध्येय असेल. तसेच आपण पंजाबमधील युवा क्रीडा क्षेत्राशी जोडला जाण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.भारताकडे ऑलिम्पिकमध्ये 200 पदक मिळवण्याची क्षमता आहे. त्यामुळे देशभरात क्रिडा क्षेत्राला चालना देण्यासाठी जे काही करता येईल ते करेन, अशा शब्दांत आपण क्रिडा क्षेत्रासाठी खुप चांगले – चांगले नियोजन केल्याचं ही ते यावेऴी म्हणाले आहेत.