हरमल / वार्ताहर
हरमल,मोरजी भागांत सात दिवसीय श्री गणेशाचे विसर्जन थाटात करण्यात आले.’गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वषी लवकर या’,अश्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
मोरजीत म्हादलेकर यांच्या श्री गणेशाचे विसर्जन आकर्षक दिंडीने करण्यात आले. यावेळी महिला- भगिनी व पुरुष मंडळींनी गजराच्या तालावर फेर धरला होता.हरमलात मधलावाडा भागातील राजन गावडे व बंधू,उमेश गावडे व बंधू तसेच गोविंद परब व बंधू यांच्या श्री गणेशाचे विसर्जन काल उत्साहात केले.
कोविडच्या मार्गदर्शक तत्वामुळे तसेच पावसाच्या भीतीमुळे, भाविकांनी संध्याकाळीच विसर्जनासाठी लगबग केली होती.