वार्ताहर /हरमल
येथील ग्रामदैवत श्री देव रवळनाथ भूमिका पंचायतन देवस्थानचा वार्षिक पावणेर तरंगोत्सव उत्सवाची गुरुवार 21 रोजी समाप्ती होणार आहे. दरवषी प्रमाणे नाईक/ठाकूर,केपकर,मेथर, गावडे व केरकर अश्या पाच मानकऱयाकडे पावणेर उरकल्यानंतर शेवटच्या दिवशी श्री देव रवळनाथ मंदिराकडे प्रस्थान होत असते.काल बुधवारी गावडे यांच्या निवासस्थानी पावणेर झाल्यानंतर तिठा मार्गे चणाईवाडा येथील केरकर यांच्या मांगरात पावणेर आला.आज गुरुवारी संध्याकाळी 4 च्या सुमारास श्री देव रवळनाथ मंदिराकडे प्रस्थान करताना खालचावाडा श्री देव नारायण देवस्थान, टेकडीवरील श्री गिरोबा,नमशी श्री देव गावडेवंश व त्यामार्गे श्री देव रवळनाथ मंदिरात आगमन होईल.