वृत्तसंस्था/ मुंबई
मुंबई संघाकडून दुर्लक्षित झालेला 28 वर्षीय डावखुरा फिरकी गोलंदाज हरमीत सिंगने भारतीय क्रिकेट क्षेत्रातून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला असून आता तो अमेरिकेतील व्यावसायिक क्रिकेटमध्ये खेळणार आहे.
हरमीत सिंगने अलिकडेच अमेरिकेतील मेजर क्रिकेट लीग स्पर्धेसाठी तीन वर्षांचा करार सीएटल थंडरबोल्ट संघाबरोबर केला आहे. 2012 साली 19 वर्षीय वयोगटातील आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकणाऱया भारतीय संघाचे नेतृत्व हरमीत सिंगने केले होते. मुंबई क्रिकेट संघटनेकडून बऱयाच दिवसापासून दुर्लक्षित झाल्याने हरमीत सिंगने भारतीय क्रिकेट क्षेत्राला निरोप देण्याचा निर्णय घेतला. अलिकडेच उन्मुक्त चंदने भारतीय क्रिकेट क्षेत्रातून निवृत्त होत अमेरिकन क्रिकेट क्षेत्रात प्रवेश केला आहे.
हरमीत सिंगने भारतात खेळताना 31 प्रथमश्रेणी सामन्यात 34.18 धावांच्या सरासरीने 87 बळी मिळविले असून फलंदाजीत त्याने 733 धावा जमविल्या. 2009 साली हरमीत सिंगने मुंबई संघाकडून प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मुंबईच्या निवड समितीकडून आपल्याला दुर्लक्षित करण्यात आल्याने अखेर निराश होवून भारतीय क्रिकेट क्षेत्रातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्याचे हरमीत सिंगने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.