नुकताच जगभरात मातृदिन साजरा करण्यात आला आहे. मातेचे महत्त्व जाणून घेणे आणि जगभरातील मातांचा सन्मान या दिवशी केला जातो. उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्हय़ातील रकसराई या गावच्या संपत्तीदेवी नामक वृद्धेसाठी यंदाचा मातृदिन अविस्मरणीय ठरला आहे. या वृद्धेच्या हरवलेल्या मुलाशी तिची याच दिवशी भेट झाली. 11 डिसेंबर 2019 या दिवशी हा मुलगा अचानक गायब झाला होता. त्याला शोधण्यासाठी ही वृद्धा अनेक ठिकाणी भटकली. अखेरीस गावकऱयांना दया येऊन त्यांनी तिला कौशांबी येथील वृद्धाश्रमात नेऊन पोहोचविले. या मुलाशिवाय तिचे जगात दुसरे कोणी नाही. त्यामुळे तो बेपत्ता झाल्यानंतर तिची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. वृद्धाश्रमाने तिला आधार दिला, पण तिचे दुःख दूर करणे त्यांच्याही हाती नव्हते. तथापि, यंदाच्या मातृदिनाच्या आदले दिवशी तिच्या मुलाचा शोध लागला. त्यानंतर पोलिसांनी त्याला वृद्धाश्रमात आणले आणि मातृदिनीच माता आणि पुत्राची हृद्य भेट झाली. दोघांनाही बराच वेळ अश्रू आवरता येणे कठीण झाले होते. वृद्धाश्रमातील इतर लोकही माता-पुत्राच्या या भेट सोहळय़ामध्ये आनंदाने सहभागी झाले. अशातऱहेने संपत्तीदेवी यांच्यासाठी ही मातृदिनाची सर्वात मोठी भेटच ठरली.
Previous Articleऑलिम्पिक झाले तर उत्तम, पण होणे कठीण!
Next Article न्यूझीलंड क्रिकेटपटूंचे लंडनमध्ये आगमन
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.