ऑनलाईन टीम / हरियाणा :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यातच आता हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः याबाबत ट्विट करत माहिती दिली.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, माझे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या माझी प्रकृती ठीक असून मी विलगीकरणात आहे. मागील काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतः ची काळजी घ्यावी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्वतःची कोरोना टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले आहे.
दरम्यान, यापूर्वी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, विधानसभा स्पीकर ज्ञान चंद गुप्ता यांच्यासह अनेक मंत्र्यांना कोरोनाची बाधा झाली होती. काँग्रेसचे राज्यसभा खासदार दिपेन्द्र हुड्डा यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.