ऑनलाईन टीम / चंदीगड :
हरियाणाचे मंत्री अनिल वीज यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली. पण महत्त्वाची बाब म्हणजे नोव्हेंबरमध्ये त्यांना कोरोनाची देसी लस कोवैक्सीनची ट्रायल लस देण्यात आली होती. त्यानंतर देखील त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
अनिल वीज यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले की, मला कोरोनाची बाधा झाली आहे. मला अंबाला कैंट मधील नागरिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांनी यावेळी आपल्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहन देखील केले आहे.
दरम्यान, देशातील ही पहिली अशी केस आहे की, ज्यांना कोरोनाची ट्रायल स्वरूपातील लस देण्यात आली होती, त्यानंतर देखील त्यांना संसर्ग झाला आहे.