ऑनलाईन टीम / सिरसा :
हरियाणाच्या माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. बुधवारी चौटाला यांचे कोरोनाचे रिपोर्ट आले, त्यामधे त्यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले.
चौटाला यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या मते, चौटाला यांच्यामध्ये सध्या तरी कोरोनाचे कोणतेही लक्षणे नाही आहेत. मात्र, त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना आयसोलेट करण्यात आले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
डॉक्टरांचे एक विशेष पथक त्यांची काळजी घेत आहे. वय जास्त असल्याने एक दोन दिवसात त्यांच्या आणखी काही मेडिकल टेस्ट केल्या जाणार आहेत.