ऑनलाईन टीम / चंदीगड :
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची आज पुन्हा एकदा कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर निष्पन्न होईल की ते कोरोनामुक्त झाले आहेत की अजून त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आहेत.
25 ऑगस्ट रोजी त्यांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले होते. तेव्हापासून त्यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉ. ए. के. दुबे यांनी सांगितले की, सध्या मनोहरलाल यांचीप्रकृती सुधारली असून, आता त्यांना ऑक्सीजन देखील द्यावा लागत नाही.
पुढे ते म्हणाले, आज पुन्हा एकदा त्यांची ब्लड टेस्ट देखील केली जाणार आहे. त्यानंतर पुढील उपचार कसे असावेत यावर निर्णय घेेेतला जाणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.