ऑनलाईन टीम / चंदीगड :
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत हरियाणा सरकारने 9 जिल्ह्यांमध्ये विकेंड लॉकडाऊन लावण्यात आले आहे. यामध्ये पंचकुला, गुरूग्राम, फरिदाबाद, सोनीपत, रोहतक, करनाल, हीसाल, सिरसा आणि फतेहाबाद या जिल्ह्यांचा समावेश आहे.
या जिल्ह्यांमध्ये 30 एप्रिलच्या रात्री 10 वाजता लॉकडाऊन सुरू होईल. हे लॉकडाऊन सोमवारी म्हणजेच 3 मे च्या सकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहील. असा आदेश हरियाणा राज्य आपदा प्रबंधन प्राधिकरणाकडून जारी करण्यात आला आहे.
- शिक्षण संस्था 31 मे पर्यंत रहाणार बंद
कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेत हरियाणा राज्य आपदा प्रबंधन प्राधिकरणाचे चेअरमन विजय वर्धन यांनी नवीन आदेश जारी केले आहेत. यानुसार 31 मे पर्यंत सर्व आंगणवाड्या, क्रेच, सरकारी – खाजगी कॉलेज, कोचिंग क्लासेस, आयटीआय, लायब्ररी, प्रशिक्षण संस्था बंद असणार आहेत. महिला आणि बालविकास मंत्री कमलेश ढांडा यांनी सांगितले की, प्रदेशातील 25,962 आंगणवाड्या केंद्र, सर्व शिशु वर्ग 31 मे पर्यंत बंद ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.