ऑनलाईन टीम / चंदीगड :
हरियाणा सरकारने वीकेंडला सुरू असलेले लॉकडाऊन आता बंद करत नवीन आदेश जारी केले आहेत. त्यामुळे दुकानदार आणि व्यापाऱ्यांना आता मोठे झटका बसू शकतो.
या नवीन आदेशाबाबत माहिती देताना हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी सांगितले की, नवीन आदेशा नुसार, आता राज्यात दर शनिवारी आणि रविवारी सर्व दुकाने आणि शॉपिंग मॉल सुरू राहतील. मात्र, सोमवार आणि मंगळवारी सर्व दुकाने, मॉल्स बंद ठेवली जाणार आहेत.
हे सर्व आदेश केवळ बाजार पेठ आणि शहरी भागांसाठी असणार आहेत. या दोन्ही ठिकाणी हे आदेश तात्काळ लागू करण्यात आले आहेत.