ऑनलाईन टीम / हरियाणा :
हरियाणामध्ये मागील चोवीस तासात कोरोनाच्या 696 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 3 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये पानिपत मधील 2 आणि झज्जर मधील एकाचा समावेश आहे. त्याामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 24 हजार 002 वर पोहोचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संसर्गाचे प्रमाण 5. 94 टक्के तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाणे 75.76 टक्के इतके आहे. गुरग्राममध्ये 142, फरिदाबादमध्ये 170, सोनपतमध्ये 59, रोहतक 14, अंबाला 45, भिवानी 8, पलवल 25, महेंद्रगड 16, हिसार 21, पानिपत 36, कुरुक्षेत्र 8, झज्जर 21, सिरसामधील 9, जींद 2, फतेहाबाद 15, पंचकुला 18, कैथल 5 आणियमुनानगर मधील एकाचा समावेश आहे.
कालच्या दिवसात 518 जणांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत 18 हजार 185 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सध्या 5495 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 322 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. यामध्ये 236 पुरुष व 86 महिलांचा समावेश आहे.