ऑनलाईन टीम / चंदीगड :
हरियाणामध्ये मागील चोवीस तासात 406 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 4854 वर पोहचला आहे. तर आता पर्यंत कोरोनामुळे 39 जणांनी आपला जीव गमावला आहे.
हरियाणामध्ये कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 35.02 टक्के आहे. तर रुग्ण संख्या वाढण्याचे प्रमाण 3.35 टक्के इतके आहे. सध्या 3115 रुग्णांवर उपचार सुरू असून, 5285 रुग्णांचे रिपोर्ट अजून यायचे आहेत. तर आता पर्यंत 1700 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
काल आढळलेल्या 406 रुग्णांमधील गुरुग्राममध्ये 243, फरिदाबाद मध्ये 97, सोनीपत मध्ये 13, झज्जर मध्ये 2, अंबाला 8, पलवल 5, पानिपत 2, जींद 3, पंचकूला 1, करनाल 6, सिरसा मध्ये 5, फतेहाबाद 1, भिवानी 2, रोहतक 15, हिसार 2 आणि कैथलमध्ये 1 नवा रुग्ण आढळला आहे. तर एका दिवसात 226 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे.