ऑनलाईन टीम / हरियाणा :
हरियाणामध्ये मागील चोवीस तासात कोरोनाच्या 795 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्याामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 32 हजार 127 वर पोहोचली आहे. सध्या 6,684 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संसर्गाचे प्रमाण 5. 80 टक्के तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाणे 77.96 टक्के इतके आहे. काल आढळलेल्या 795 रुग्णांमध्ये गुरग्राममध्ये 108, फरिदाबादमध्ये 218, सोनपतमध्ये 50, रोहतक 00, भिवानी 11, रेवारी 91, करनाल 81, अंबाला 80, झज्जर 22, पलवल 00 , नूह 11, महेंद्रगड 16, हिसार 35, पानिपत 22, कुरुक्षेत्र 19, सिरसामधील 31, जींद 00, फतेहाबाद 00, पंचकुला 6, कैथल 2 आणि चरखी दार्दीमधील 2 जणांचा समावेश आहे.
आतापर्यंत 25 हजार 046 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 397 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. यामध्ये 285 पुरुष व 112 महिलांचा समावेश आहे.