ऑनलाईन टीम / चंदीगड :
कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या ‘रेमडेसिवीर’चा काळाबाजार रोखण्यासाठी हरियाणा सरकार आता सक्रिय झाले आहे. या राज्यात रेमडेसिवीरचे दोन डेपो असून, तिथे लक्ष ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच ज्यांच्याकडून रेमडेसिवीरची मागणी होईल, त्यांचे आधारकार्ड तपासण्यात यावे. आम्ही या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या 4 जणांना अटक केली आहे, असे हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी म्हटलेे आहे.
हरियाणामध्ये ब्रिटन स्ट्रेनची प्रकरणेही वाढू लागली आहेत. दिल्लीतील प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेल्या 40,000 नमुन्यांपैकी 152 नमुन्यांमध्ये ब्रिटनचा स्ट्रेन आढळून आला आहे. एनसीआर आणि जीटी बेल्ट जिल्ह्यात ही प्रकरणे नोंदविली गेली आहेत.
मागील आठवड्यात ब्रिटनच्या स्ट्रेनचे 12 रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी कर्नालमध्ये 10 आणि गुरुग्राममध्ये 2 रुग्ण सापडले.