ऑनलाईन टीम / चंदीगड :
हरियाणातील उच्च शिक्षण विभागाकडून महाविद्यालय आणि विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आपल्या अधिकृत फेसबुक हँडल माध्यमाद्वारे लाईव्ह योगा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या योगा दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात जवळपास 72 हजार स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांसाठी ‘योगा ॲट होम, योगा विथ फॅमिली’ थीमवर आधारित स्पर्धा देखील आयोजित केली होती.
या स्पर्धेतील टॉप 20 च्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी 5 हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे. संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी योगा करण्यास प्रोत्साहित करणाऱ्या महाविद्यालय आणि विश्वविद्यालयांना देखील 21 हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. शिक्षण मंत्र्याच्या आदेशावरून जून महिन्याच्या सुरुवातीलाच विभागाकडून आपल्या फेसबुक हॅण्डलवर दैनंदिन योगा सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मिस कॉल देऊन टोल फ्री नंबर वर नोंदणी करायची होती आणि त्यानंतर 21 जून रोजी लाईव्ह सत्रात सहभाग घ्यायचा होता. ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या कुटुंबासोबतचा फोटो अपलोड करायचा होता. या स्पर्धेतील विजेत्यांची यादी पाच सदस्यांची समिती तयार करणार आहे.