वृत्तसंस्था/ सिमडेगा
गुरुवारी येथे झालेल्या हॉकी इंडियाच्या 11 व्या उपकनि÷ महिलांच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेचे अजिंक्मयपद हरियाणाने पटकावले. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात हरियाणाने झारखंडचा शूटआऊटमध्ये 4-3 अशा गोलफरकाने पराभव केला.
हा अंतिम सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. निर्धारित वेळेत दोन्ही संघांकडून गोलखाते उघडले गेले नाही. सामन्याच्या उत्तरार्धात गोलकोंडी कायम राहिल्याने पंचांनी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब केला. पेनल्टी शूटआऊटमध्ये हरियाणातर्फे 4 गोल तर झारखंडतर्फे 3 गोल नोंदविले गेले. पेनल्टी शूटआऊटमध्ये झारखंडतर्फे एडलिन बॅगे आणि स्वीटी आणि निशा यांनी गोल केले. झारखंडचे पेनल्टी शूटआऊटमधील दोन गोल हरियाणाच्या गोलरक्षकाने अडविले. हरियाणातर्फे पेनल्टी शूटआऊटमध्ये ऋतिका, कनिका, मनीषा आणि साक्षी राणा यांनी गोल केले. 2021 च्या उपकनि÷ महिलांच्या राष्ट्रीय हॉकीच्या विजेतेपदावर हरियाणाने आपले नाव कोरले. या स्पर्धेत उत्तरप्रदेशने तिसरे स्थान मिळविताना ओडिशाचा 3-1 असा पराभव केला.