- ऊसाच्या दरात प्रति क्विंटल भाव 10 रुपयांनी वाढ
ऑनलाईन टीम / चंदीगड :
हरियाणा सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनंतर हरियाणा सरकारने ऊसाचा दर 10 रुपये प्रति क्विंटल इतका वाढवला आहे. त्यामुळे ऊसाला आता 340 रुपयांऐवजी 350 रुपये प्रति क्विंटल मिळणार आहेत.
अधिक माहिती देताना हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी सांगितले की, बाजारात साखरेला पुरेसा भाव नसताना देखील, प्रदेश सरकारने शेतकऱ्यांनी मागणी केल्यामुळे ऊसाला प्रति क्विंटल मागे दहा रुपये वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या हा दर प्रति क्विंटल 340 रुपये आहे. तो आता प्रति क्विंटल 350 रुपये होईल. ऊसाला हा देशात मिळणारा सर्वाधिक दर आहे. त्याच बरोबर भांड्यांच्या पेरणीचा हंगाम लक्षात घेता सिलका आणि परवल जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात 8 ऐवजी आता 10 तास वीज पुरवठा केला जाणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.