- काही निर्बंधात देण्यात आली आणखी सूट
ऑनलाईन टीम / चंदीगड :
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हरियाणा सरकारने लॉकडाऊनमध्ये 5 जुलैपर्यंत वाढ केली आहे. मात्र, यातील अनेक निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली आहे. यामध्ये प्रदेशातील सर्व दुकाने आता सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सकाळी 9 ते रात्री 8 या वेळेत दुकाने सुरू असतील. यासह प्रदेशातील मॉल देखील सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत सुरू असतील. तर रेस्टॉरंट आणि बार सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेत सुरू असणार आहेत. यावेळी 50 टक्के क्षमतेने आणि सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
यासोबतच रात्री दहा वाजेपर्यंत रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये पार्सल सुविधा सुरू असणार आहे. या सोबतच सरकारने धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिली आहे. यासोबतच कॉर्पोरेट कार्यालये देखील पूर्ण कर्मचारी क्षमतेने सुरू केली जाणार आहेत. सर्व कार्यालयांना नियमितपणे सॅनिटाईज करणे अनिवार्य असणार आहे.
लग्न समारंभ, अंतिम विधीसाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये सूट दिली असल्याची घोषणा केली आहे. मात्र, 50 लोकांनाच एका वेळी प्रवेश दिला जाणार आहे. मात्र, यावेळी लोकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे.
सरकारकडून जारी करण्यात आलेल्या नवीन आदेशानुसार आता राज्यातील स्विमिंग पूल सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासह गोल्फ क्लब मधील बार 50 % क्षमतेसह सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.