वार्ताहर/ मौजेदापोली
दापोली तालुक्यातील हर्णै बंदरात उभ्या असलेल्या बोटीवरून तोल जाऊन पडून एका खलाशाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिइ मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
या बाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वणौशी भिवबंदर येथील नारायण खांडेकर (65) हे मच्छीमारी बोटीवर खलाशी म्हणून काम करीत होते. 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ते काम करत असलेल्या बोटीवरून तोल जाऊन पडले व त्यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा अधिक तपास दापोलीचे पोलीस करीत आहेत.