हमारा देश संघटनेचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
शिमोगा येथे बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्ष याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. याबाबत जे चित्रीकरण दिसून आले आहे ते अत्यंत हीन आहे. एका कार्यकर्त्याची अशाप्रकारे हत्या केली आहे. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. तेंव्हा तातडीने त्या आरोपींना अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी हमारा देश संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
इतकी भयानक हत्या करण्यात आल्यानंतर सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे. या घटनेतील आरोपींना जेरबंद करून त्यांच्यावर खटला दाखल केल्यानंतर तो फास्टट्रक न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. या घटनेमुळे हिंदू कार्यकर्ते तणावाखाली आले आहेत. अशाप्रकारे हिंदू कार्यकर्त्यांवर हल्ले होत असतील तर भविष्यासाठी ही धोक्मयाची घंटा आहे. तेंव्हा तातडीने आरोपींवर कारवाई होणे गरजेचे आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी व्यंकटेश शिंदे, सम्राट गोडसे, प्रशांत राणे, सतीश उंडाळे, महेश पाटील यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.