प्रतिनिधी/ चंदगड
हलकर्णी नाईकवाडीतील कौलारू घरामध्ये तीन पानी जुगार खेळणाऱया 24 जणांकडून रोख 290380, मोबाईल संच, एक मोटरसायकल, एक बोलेरो आणि एक मारुती वाहन असा 7 लाख 98 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल साहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. प्रकाश अमृतकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जप्त केला. बुधवारी ही कारवाई करण्यात आली.
युवराज कृष्णा नाईक याच्या राहत्या घरात जुगार सुरू होता. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता स्थापन केलेले पोलीस पथक चंदगड तालुक्मयात आले होते. अज्ञात व्यक्तीने दिलेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. चंदगड येथील झाकिर युसुफ नाईक, मन्सुर महमद पटेल, हिदाईदतुल्ला काशीम मकानदार तर बेळगाव आणि बेळगाव पंचक्रोशीतील सुनील कलाप्पा कोळी (रा. कंग्राळी), राम बाळकृष्ण निलजकर (रा. कंग्राळी), मल्लिकार्जुन तुकाराम कांबळे (रा. शाहूनगर-बेळगाव), शिवानंद यल्लाप्पा गडकरी (रा. शाहूनगर-बेळगाव), राहुल भैरू राजगोळकर (रा. गांधीनगर-बेळगाव), यल्लाप्पा परशराम जाधव (रा. बेनकनहळी), बसवंत बाळू पाटील (रा. आंबेवाडी-बेळगाव), सुनील कल्लाप्पा पाटील रा. जाफरवाडी, पवन सुरेश शिंदे (रा. हिंडलगा), तौफिक मोहमद मुल्ला रा. हिंडलगा, हनमंत नागाप्पा हुकडे (रा. कंग्राळी), सुशांत कामाणा कडोलकर (रा. बाक्साईट रोड-बेळगाव), गिरिश नागेश खरडेकर (रा. कंग्राळी), नागराज जयवंत हन्नुरकर (रा. कंग्राळी), विनायक रघुनाथ सुतार (रा. हिंडलगा), झाकिर हुमायुन मुल्ला (रा. हिंडलगा), अखिलेश महादेव भादवणकर (रा. बेळगाव), अनिस समयलाल पाल (रा. बेळगाव), किरण शिवाजी बाचीकर (रा. शहापूर), सुरेश जगन्नाथ संकपाळ (रा. हिंडलगा) आणि प्रताप परशराम जुवेकर (रा.बेळगाव) यांना जुगार खेळताना पकडून त्यांच्यावर मुंबई जुगार ऍक्टप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. पोलीस पथकात साहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. माने, रामदास किल्लेकर, अमोल देवकुळे, वैभव गवळी, अनिल अष्टेकर, युवराज पाटील, विकास कांबळे आदींचा सहभाग होता.